Best Marathi Poems On Love | मराठी प्रेम कविता.

100+ Marathi Poems On Love | मराठी प्रेम कविता.100+ Marathi Poems On Love, best marathi kavita sangrah on love [ मराठी प्रेम कविता.] marathi poem in marathi language Best love and emotional felling marathi poem for girlfriend / gf, marathi love poems for your husband or wife or for caption.


marathi poem for wife

तुला पाहतो ग

“स्वप्नातल्या नयनरम्य सरोवरात जल शांत अन् नितळ वर क्षितीजाल भिडलेलं घूमटाकार निरभ्र निळं आभाळ भोवताली पाचूची हिरवी शाल लेऊनी ऊभी सुरेख कमळं त्यात तू अन् मी करतो विहार करूनी निर्मळ मन मोकळं ग तुलाच पाहतो ग

सरोवराच्या काठावर बसून नजरेने खूप गप्पा मरतो तुझ्या गालावरून ओघळणारे जलबिंदू अलगद टिपतो डोळ्यावर येणार्या खट्याळ बटांना हळूवारपणे सारतो किरणांनी तेजोमय झालेल्या तुझ्या रूपाने मी भारावतो ग तुलाच पाहतो ग

न बोलता खूप काही बोलतात भाव तूझ्या नजरेतले जाणवतात सूरात चाललेली स्पंदने तुझ्या ह्र्दयातले मंत्रमुग्ध करतात मला मंद स्मित तुझ्या ओठातले रोमांचीत करते मला; सुख तुझ्या कोमल स्पर्शातले ग तुलाच पाहतो ग

जीवनवळणावर पाहताच क्षणी झालीस तु माझी सखी जरी असलो तुजसाठी मी फक्त एक वाटसरू अनोळखी वेड लागले जीवा तु ह्र्दयसम्राज्ञी अन् तुच माझी चंद्रमुखी जर झालीस तू माझी असेन माझ्या सारखा मीच सुखी दिसे न मज कोणी ह्या भूलोकी अजूनही तुझ्या सारखी ग तुलाच पाहतो ग"

Credits -
शुभांगी सुभाष
shubhgaik@gmail.com
Visit site -


marathi poems on love,marathi poem for husband, marathi kavita,marathi poem for wife,marathi poem about love,marathi poem for gf,marathi poem girlfriend


marathi poem for husband

तुला पाहते रे

येणार कोणीतरी लागली चाहूल, आली मनास जाग कोणीतरी होऊ पाही माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग

उजाडला तो दिवस भेटण्या मजला आलास माझ्या घरी नकळतच शहारले मनी अन् दाटले भीतीचे काहूर ऊरी

तुला पाहण्या आधी तुझ्या मुखातले शब्द पडले माझ्या कानी झाले मोहीत ऐकूनी आत्म्यविश्वासाने भरलेले शब्द ते वजनी

उत्सुकतेने हळूच पाहिले दूरून तुझे रूबाबदार व्यक्तीमत्व भारदस्त शरीर आणि करारी नजर ह्याचेच मज वाटले महत्व

देण्यास पाहूण्यांना दिली आईने चहाची कपबशी मम हाती देताना चहा तुजला,भीतीनं थरथरत्या हाताची वाढली गती

नजरेला भिडताच नजर विलंब न करता दिलास मज होकार निर्णय घेण्याची तुझी तत्परता,सांगून गेली कर त्याचा स्विकार

भारावले मी मनोमनी, पाहूनी चैतन्याची ज्वलंत ज्योत स्वप्न साकार करील जीवनाच, हेच ते जन्मोजन्मीच नात

बांधुनी रेशीम गाठी झालास मम जीवनाचा अविभाज्य भाग सार्थ अभिमान वाटतो, लाभले मजला तव अर्धांगिनीच भाग्य

होऊनी सावली माझी, व्यापलेस तू माझे तनमन सारे आत्मविश्वासाने, प्रतिबिंबात माझ्या तुलाच पाहते रे

Credits -
शुभांगी सुभाष
shubhgaik@gmail
Visit sitemarathi poem about love

राणी तू भोळी

माझ्या संसाराची तूच आहेस माडी तुला पाहून जगतो लावून लाडी गोडी

तुझ्या गं गालावर प्रतिबिंब माझ्या ओठांचे तू सावली माझी तर नाव घेऊ कोणाचे

आज हसू पाहून तुझे चंद्र लाजला लाजला तुझ्या वेडा पाई गं एक कवी हा गाजला

तुझ्या डोळ्यांची नक्षी काळजावर स्वार होते सागरी डोळ्यांची तू गं दुःखाला जगण्या पार नेते

मी तुझा तवा होणार तू माझी पुरण पोळी किती प्रेम करतेस तू अशी राणी तू भोळी

अशीच रहा सोबती तू हा राघू देतोय आरोळी करून घे तयारी तू ही पूर्ण करण्या प्रेम चारोळी

फक्त तुझ्यासाठी

Credits -
कविराज.अमोल मीरा दशरथ शिंदे
मो.९६३७०४०९००.अहमदनगर
Visit sitemarathi poem caption

तुझं अनं माझा प्रेम ...

तुझं अनं  माझ प्रेम...
गुलमोहरा प्रमाणे फ़ुलू दे प्रत्येक क्षण  वाऱ्यावर  झुलू दे  I
तुझं अनं  माझा प्रेम....
मोगऱ्या प्रमाणे बहरू दे  त्या प्रेमाच सुगंध  सर्वत्र दरवळू दे I
तुझं अनं  माझा प्रेम...
निवडुंग प्रमाणे होऊ दे  काट्यामध्ये सुद्दा फुलून येऊ दे  I
तुझं अन माझं प्रेम ...
सागराप्रमाणे विशाल होऊ दे  मन सोक्त वाहून पैलतीरी जाऊ दे  I
 तुझं अनं  माझा प्रेम...
 जमिन आणि आकाश प्रमाणे होऊ क्षितीजया प्रमाणे भासू दे
  एकत्र आले नाही तरी  हसू दे   I
तुझं अनं  माझा प्रेम...
चंद्र सारख असू दे  दिवस आकाशाची साथ सोडली तरी रात्रीत दिसू  दे  I
तुझं अनं  माझा प्रेम..
राधा कृष्णा प्रमाणे असू दे  एकत्र नसले तरी प्रत्येकाला स्मरू दे   I
 तुझं अनं  माझा प्रेम...
प्रेमच असू दे  भावाने ला भार झालाय थांब!............ जरा आश्रू पुसुदे   I
 तुझं अनं  माझा प्रेम ...
 प्रेमच असू दे........ II

Credits -
Visit site -marathi poem for gf

marathi poems on love,marathi poem for husband, marathi kavita,marathi poem for wife,marathi poem about love,marathi poem for gf,marathi poem girlfriend


पुन्हा एकदा तू भेटून जा..

हळूच प्रिये तू येऊन जा, कानात काही गुणगुणून जा...

   वाऱ्याच्या झुळूकीप्रमाणे,  सहवास तुझा तू देऊन जा...

   सुंदर मादक गंध तुझा,  मागे सुगंध तू ठेऊन जा...

   दर्वळूदेत सभोवतालचे सारे,  धुंद मला तू करून जा...

   तुझ्या पैजणांची रुणझुण,  हलकेच चाहूल देऊन जा...

   रात्री मन माझे कावरे बावरे,  स्वप्नात मला तू घेऊन जा...

   स्वर्ग वाटे सभोवती सारे,  तुझे असणे तू देऊन जा...

   अश्रू दाटले आठवणीत सारे,  तयांची वाट मोकळी तू करून जा...

   पुन्हा एकदा तू भेटून जा...

 भेटून जा....

Credits - Visit site 


More marathi poems on love coming soon..