Ganpati stotra in marathi [ श्रीगणपती स्तोत्र ] मराठी स्तोत्र

Ganpati stotra in marathi [ श्रीगणपती स्तोत्र  ] मराठी स्तोत्र

श्री गणपती स्तोत्र मराठी ( ganpati stotra in marathi ) हा संस्कृतमधील मूळ गणपती स्तोत्रांचा अनुवाद आहे जो नारद मुनि यांनी तयार केला आहे. हे अनुवाद श्रीधर स्वामी यांनी केले आहेत. ही गणेशाची १२ नावे आहेत. कोणीही सहा महिने दररोज या स्तोत्रांचे ( ganpati stotra ) पठण करतो; त्यानंतर त्याचे सर्व त्रास, अडचणी भगवान गणेशच्या आशीर्वादाने नामशेष होतात. 

Shri ganpati stotra in marathi - 

||  श्री गणपती स्तोत्र ||


साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका ।
भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥
प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥
पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते ।
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक ।
अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥
    देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।
             विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ ५ ॥
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन ।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥
नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें ।
श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥
॥ श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥


Ganpati stotra in marathi

ALLSO CHEK THIS POSTS-


Sai Baba Aarti Lyrics Marathi - आरती साईं बाबा लिरिक्स - Aarti Sai Baba